Wednesday, 8 February 2012

वळून वळून पाहतेस
जीवघेणी कातील तुझी खोड ....
भिवई ताणून तिरका कटाक्ष
अदा तुझी चॉकलेट पेक्षाही गोड ....


                   ...........शैलेश
_____________________


लाजून जेव्हा सावरतेस
कानामागे केसांच्या बटांना ....
वितळतो मी चॉकलेट सारखा
पाहून गोड अदांना ....



                 ...........शैलेश

चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेछ्या !!!


गुपित माझ्या मनाचं
आभाळाला सार्या सांगायचंय ...
नाव तुझं सर्वांसमोर
मला उखाण्यामध्ये बोलायचंय ...




             _________शैलेश

Wish you all Happy n lucky Propose day ............!!

वाट पाहता पाहता तुझी ,
वर्ष आणखीन एक उलटून गेलं ...
या वर्षीचं गुलाब सुद्धा
माझ्याच हातात कोमेजून गेलं .....

               _________शैलेश

गुलाबी गुलाब दिवसाच्या गोड सुभेछा

Tuesday, 7 February 2012

तिनसाना मान्गराच्या वळणावर
अर्थ प्रेमाचो कळलो
ठसन दिल्यान बेबल्यान अशी
काळजाचो तुकडो ....सुकाटावानी जळलो...

सड्यावरच्या गडग्यात
जीव बेब्ल्याक खेटलो
चोरुन गुलाब गुलाबी देताना
पतार्यात सरडो ....घाबराण सळसाळलो ...

बेबला घायाळ लाजल्यार
उरात श्वाश गरामलो
नजर तुकवन love u बोलताना
वाकड्या सागार ...कावळो नेमको कोकाललो ....

प्रेम-पतुर हातार दिल्यार
ओठ जरासो थरारलो
होकार कानार येतलो इतक्यात
झाळीत शकल्याचो डोळो .... घुबडावानी चमाकलो ...

माझ्या प्रेमप्रकरनाचो शकल्यामुळा
सगळो गेमच फिस्काटलों
माझ्या लफड्यांचो समदो पाढो
सगळ्या आवाटासमोर इसकाटलो ....

लफड्यांची नावा भायर पडल्यार
आवाटाचो पारो खवाळलो
वळणावर जागराच्या मांगरासमोर
लफड्यांचो महाप्रसाद आणि सत्कार घडलो
आणि माझ्या लफड्यांचो ....असो गावभर गवगवाट झालो  .....

                       ____________  शैलेश










Wednesday, 25 January 2012

आज काम ज़रा जास्त आहे,दररोज ओफिस मधे वाटतं...
भर ऑफीसात फाइल्सचा ढीग बघून , आभाळ  मनात दाटतं...
तरी हात चालत राहतात , पण  मेन्दु चालत नाही...
कीबोर्ड शिवाय ऑफीस मधे , कुनिच बोलत नाही...
तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो , तितक्यात कुठून एक मेल पीसी मधे येतो .....
वाचून त्यातिल काही भाग , जीव कंठाजवळ  घेतो...
जीव उनाड़ मुलासारखा , प्रॉजेक्ट फाइल्स सैरा वैरा शोधत राहतो
ड्रॉवर्स , लॉकर्स , नि कपाटाच्या छपरावर्तीहि चढ़ुन पाहतो...
एका मागुण दूसरया मेल चा ,  सुरू होतो पुन्हा खेळ
खुर्ची मागुण चालत येतो ,  बॉस घेऊन लेटरहेड.
चक्क  डोळ्यान समोर , बॉस कूस बदलून घेतो....
प्रॉफेशन पीरियड अगोदरच , बॉस कुठून  टरमीनेशन लेटर देतो...

.....................................................शैलेश ......

Monday, 23 January 2012

मागणी लग्नाची तिला घातली जेव्हा
सावरून ओढणी , ती लाजली
उंचावल्या भुवया अदेने तेव्हा
स्वर्गीची अप्सराच जणू मी पाहिली ____

ओठांतले शब्द अडवून जेव्हा
बावरी नजरेतून , सारे बोलली
माझ्या मनीची कामना तेव्हा
मोक्षाष जावून पावली _____

नजरेस भीडली नजर जेव्हा
वाटले कवटाळूनी मिठी तिने मारिली
वेनितला तुझ्या गुलाब हि तेव्हा
हिरमुसला , सांडूनि गुलाबी पाकळी ____

जाणिला भावार्थ नजरेचा जेव्हा
माझी पापणीहि जराशी लाजली
कटाक्ष तिरका भिडला तेव्हा
माझी गात्रेच सारी
गोठली ____

धुंद ती अन बेधुंद मी हि तेव्हा
सीमा दोघांनि होती लांघली
ओठांवर ओठ विसावून तेव्हा
गीत मिलनाचे ...... मने दोघांची , गायिली______


                        ________ शैलेश

स्मित तिचे मोहक असे
जशी ग्रीष्मात , वळवाची सर ;
गोबर्या गालावरची गोड खळी
जशी पावसात , गारव्याची भर

               ________ शैलेश

Wednesday, 11 January 2012

मला मनातून वाटतंय,
तु मला संध्याकाळी अचानक भेटावं,
कवितेत आजवर लिहिलेलं ,
सारं तूला माझ्या ओठांनी सांगाव ,
माहित नाही तू तेव्हा काय बोलशील
रागावून पाठ फिरवशील
कि लाजून पुन्हा लाईक करशील ...
मनातल सारच तेव्हा काही
माझ्या ओठांवर नसेल
तरीही तुला सार काही
माझ्या डोळ्यातून
उमजेल
हवेत हि तेव्हा उमटेल मस्त गारठा
आपल्या पहिल्या भेटीचा प्रेमळ हिंदोळा
खुलेल सहवासाचा इंद्रधनू हि तेव्हा रुपेरी
लाजून तुला चंद्र हि लपेल ढगानआड आभाळी
कस सगळ मला अगदी स्वप्नागत भासेल
भेट पहिली तुझी अन माझी
आयुष्याची गोड साठवण असेल....
काय माहित असा अचानक
तू कधी भेटतलस कि नाय
कि रोज सारख्या टिपूस न ढळता
आभाळ भेटीचा नुसताच ढगांनी , दाटवून रवतलस कि काय ???


                    ________ शैलेश

रात्रंदिवस तिलाच स्मरतोय मी
तिला बरोब्बर समजायचं ...
माझ्या मनातल्या गोष्टी
मन तिचं लबाड...... हळूच चोरून ऐकायचं
कधीच काही लपलं नाही
तिच्या पासून मनातलं माझ्या
मी हि ओळखून होतो
छुप्या गोष्टी काही , मनातल्या तिच्या
दिसली मला कि अगदी
मी बेधुंद होवून जायचो
साठवून तिला हृदयात
आठवणींचे मोती बनवून जपायचो
बोलायला लागली कि
शब्दांत तिच्या भिजून जायचो
ती नसताना मग त्यांच्याशी
खूप खूप गप्पा रंगवायचो
आरश्यासमोर राहिलो उभा कि
प्रतिबिंब समोर तीचेच दिसायचे
उन्हात हि सावूलीत माझ्या
मला तिचेच भास छळायचे
मित्रांच्या गराड्यात नेहमी
ती केंद्र बिंदू असायची
तरीही नजरेचा कटाक्ष देवून मला
खट्याळ स्पर्श देवून जायची
तिच्या डोळ्यांत पाहिल्यावर
माझे  नेहमीच असे व्हायचे
हृदयातून शब्दांचे झेरेच फाटून
कवितांचे सागर उधळायचे
तिला प्रेमाबद्दल विचारावे कि नाही
विचाराने मनात काहूर माजायचे
नकार देइल ती या भीतीने
प्रेमाचे गुलमोहर काळजातच कोमेजायचे
कधीच नाही दाखवू शकलो तीला
डोळ्यांतली  स्वप्ने माझी
अन ओठातच दबून राहिली
तिच्या माझ्या प्रीतीची गाणी
उडायचेच राहिले आकाशी
पतंग तिच्या माझ्या निखळ प्रेमाचे
दोर काटला शेवटी
माझ्याच धीर एकवटू न शकलेल्या अबोल्याने
थांबून थोडा वेळ माझ्य्साठी
ती त्या वळणावरून आता परतून गेली
आणि माझ्या पहिल्या  प्रेमाची  वाळू
माझ्याच अबोल मुठीतून निसटून गेली .........

             _______ शैलेश



फेसबुक वर झाली आमची ओळख
करायचो तिला  मी रोज हाय
बोलायचं असायचं खूप काही
पण व्हायची ऑफलाईन , करून लगेच बाय ...

रोज छान स्टेटस अपडेट करायची
कधी कविता चारोळी स्वत लिहायची
सगळ्या फ्रेण्डलीस्ट च्या दिलांची धडकन
माझ्या हि हृदयात  धडकायची

खूप लिहिल्या कविता तिच्यावर
पण तिला त्या कधी कळल्याच नाहीत
माझ्या स्टेटस वर फ़क़्त मीच वाचत बसलो
कमेंट तिने त्या कधी केल्याच नाहीत

मलाही हि तिने नोटीस कराव
एवढीच इच्चा असायची
कमेंट नको निदान लाईक
एवढीच कवितेची मागणी असायची

ओंलैन आली जरी थोडक्यासाठी
चाटीन्ग्वर हि बोलायला जमलेच नाही
माझ्या कविता मीच गिरवीत बसलो
तिने कधी त्या वाचल्याच नाहीत

एक दिवशी गोष्ट घडली मात्र अजब
माझ्याच वाल वर पोस्ट तिने टाकली गजब
खूप छान लिहितोस रे तू कविता
लिहून स्वीट शी स्माईल तिने टाकली
विश्वास नवता बसत म्हणून
हजारदा त्यादिवशी होती वाचली

वाचून ती पोस्ट सगळे फ्रेंड हि झाले शौक
माझाही काळीज झाला होता पुरता खल्लास
पडले होते सगळेच असे धारातीर्थी
कारण झाला होता पप्पू प्रेमाच्या परीक्षेत  पास

११.११.११ च्या दिवशी तर मात्र
माझं नसीब दणकावून फळफळलं
होतो मीच  तिला विचारणार
त्या आधी तिनेच प्रोपोस होतं केलं

च्या sss ला आज च्या  ११.११.११ मुहूर्तावर
माझी रडकी लाईफ झाली बघा कशी चेंज
आज पासून मी तिचा boyfriend
आणि मला मिळाली girlfriend

                _______ शैलेश


Tuesday, 10 January 2012

मनाला माझ्या उसवून गेलीस
आठवणी काळजात बांधून गेलीस ___
जाळ विरहाचा जाळलास असा
अश्रूंची कवाडं उघडून गेलीस ____

ऋतूचक्र प्रेमाचं शिकवून गेलीस
कधी थंडी कधी ग्रीष्मात पोळून गेलीस ___
फुलवलास वसंत कधी तू प्रीतीचा
अन ओलीव मनाची शेवटी भेगाळून गेलीस ___

वाटा नशीबाच्या तुच ठरवून गेलीस
माझ्या जिंदगीची पान काही लिहून गेलीस ____
जपलेली पाने मी ... दुमडून काही
पण जाताना संपूर्ण वहीच तू फाडून गेलीस ___

काही क्षण दिवाने रंगवून गेलीस
नशा तशीच मदिरेतहि सांगून गेलीस ___
तुझ्या आठवणींची धुंदीच इतकी
मादिरेवर सुद्धा शेवटी तू हासून गेलीस ___

'काळजी घे स्वताची' जाताना बोलून गेलीस
अन काळजात एक जागा राखून गेलीस
तूला बेवफा ठरवून तरी ठरवू कसा मी ???
वळून पाहिलंस जाताना .......अन भिजलेली पापणी तू दाखवून गेलीस ...


                          _____ शैलेश

'आज तू नक्की येशील' सांगून मनाला
उसना आव आणून मी हसवतो ___
शोधीत राहतो अश्रूंच्या लाटा गिळून सैरावैरा
अन अस रोज ,  माझंच मला मी फसवतो___

                 _____ शैलेश

माझे श्वाश आणि तुझे भास
मनात समांतर नांदतात ___
श्वाशा मागून भास अन भासांमागून श्वाश
हृदयात एकसमान चालतात ____

             _____ शैलेश

तुझ्याशिवाय जगणं मणजे
भलतंच कंटाळवानं झालंय ___
आठवणी तुझ्या रोज येतात
पण तुझं येनं फारच दुर्मिळ झालंय ___

           _____ शैलेश

एकांतात एकटीच हसते मी
प्रत्येक क्षणात तुझाच भास आहे ___
माझ्या हृदयात दरवळणारा
तुझ्याच आठवनींचा हर एक स्वाश आहे ___

        _____ शैलेश



वचनांवर दिली वचने
किती छान एक एक तिची थाप होती ___
खोट्या शपथा खाण्यामधे तर
ती बकासुराचीपण बाप होती ___

          _____ शैलेश



मन माझं लबाड ...
हल्ली फारच वेड्यागत वागतं ___
माझ्या प्रोफाईल पेक्षा
तुझ्याच प्रोफाईल वर....... ठेवून लक्ष असतं___

तुझ्या स्टेटसखाली पाहून गर्दी
मन गोठून कुडकुडतं ___
पोस्ट नसली कळाली तरी
कमेंट करायला लुडबुडतं ___

लाईक तुझी मिळावी म्हणून
कधी कधी समाजकारण करतं ___
'सपोर्ट अण्णा हजारे' ची पोस्टिंग करून
वेगळंच राजकारण खेळतं ___

लाईक
तुझी मिळेपर्यंत
स्टेटसबार आमरण अनशन धरतो ___
"नाईस पोस्ट" अशी कमेंट मिळाल्यावरच
उपोषणाचा रुसवा सोडतो ___

तुझ्या प्रोफाईलची वारी मी
दर सेकंदाला करत असतो ___
उपडेत तुझ्या घेण्यासाठी
मावूस माझा झिजवत असतो ___

तुझ्या वर कविता करण्यासाठी
माउस आणि किबोर्डला मी गुंतवलय ___
पेडींग मेल्सचा वाढलाय ढीग
तरी पीसी प्रोब्लेम सांगून , बोसला सुद्धा कटवलय

प्रोफाईल ची माझ्या प्रत्येक धडकन
तूझ्या प्रोफाईल ला लाईक करते ___
पण तू करतेस कि नाही
या कमेंटवर गोंधळून धडपडते ___

दिवसातून एकदा तरी भक्ताच्या
प्रोफाईल ला विसिट करून जा ___
प्रोफाईल अपडेट होतं फ़क़्त तुझ्याचसाठी
त्याला किमान एकदा नुसत ...... लाईक तरी करून जा ___
                  _____ शैलेश 

सुगंधी मोगरा होवून
मला फुलायचे आहे ____
आयुष्य गुंफून गजर्यात
केसांवर तुझ्या झुलायचे आहे ____

तुझ्या फ़क़्त चाहुलीवर
कळीतून मनमुराद फुलायचे आहे ____
तुझ्या स्पर्शाचा घेवून सुगंध
नभात पंखलावून दरवळायचे आहे ____

गंधाळायचे
हळुवार सुगंधी
श्वासात तुझ्या भिनायचे आहे ____
श्वाश बनून तुझा
हृदयात कायमचे राहायचे आहे ____

क्षणभंगुर जरी जीवन माझे
बेधुंद जगायचे आहे ____
मनात तुझ्या ओतून सुगंध
सर्वस्व तुझ्यावर लुटायचे आहे ___

तुझ्या केसांत गजरा बनून
तुझ्या सोबत डूलायाचे आहे ___
एक एक पाकळी सांडून मग
ओठांवर तुझ्या मरायचे आहे ___

प्रेम कसे करावे
जगाला दाखवायचे आहे ____
तुझ्या साठीच जगायचे आहे
अन केसांत तुझ्या विझायचे आहे ____________


           _____ शैलेश


संध्याकाळ भरून आल्यावर
मन आईच्या उंबरठ्यावर निघून जातं ___
दिवे लागणीला तुळशीवृन्दावनापाशी
शुभंकरोती म्हणून येत ____

              _____ शैलेश

अश्याच प्रत्येक कातरवेळी
अंधार क्षितिजावर दाटून येतो ____
अन तुझ्या आठवांचा कृष्णमेघ
पापन्यांमधून झिरपून जातो ___

         _____ शैलेश

सूर्य हि एक ठिपका
ठिपका तो चंद्र पण ___
आकाश गंगा हि ठिपक्यांची
ठिपका ती स्वतापण _______
मी हि एक ठिपका
ठिपका तू पण ....
मिसळून जावू एकमेकांत
नको मोठेपणाचे वेगवेगळेपण _____-

              _____ शैलेश

तुझ्या गहिर्या डोळ्यांत
सांगू कित्ती आणि कसा जातो मी हरवून ____
अनुभवलस का कधी ????
सुगंधात गुलाबाच्या तू मिसळून _____

             _____ शैलेश

ना बैचेनी है ना तेरा इन्तजार है ....
ना तू है तो दिल को करार है ....
तेरे जाने से परेशां नहीं हूँ मैं
परेशां होना तो आदत सी बन गई है ......
तेरे जाने का गम नही , मगर जुबाँ खामोश सी हुवी है.......!!!

                       ________ शैलेश



भूलन्यासाठी विरहाचा वार कोवळा
माझ्या अस्तित्वाचा मीच ,तिरस्कार केला _____
कधी गुंफिला हार सिगारच्या धुव्याचा
कधी काळजावर बिअर , कधी विस्कीचाही वार केला ___

                  ________ शैलेश



भेटलो नाही जरी कधी तुला
तरी वाटते असे , ओळख आपुली फार पूर्वीची .........
तुजबरोबर चालल्याचे क्षणोक्षणी भास मला
कदाचित आठवण असावी ती......सप्तपादिंची .......

              ________ शैलेश



इतकाही गुंतू नको तिच्यात कि
तुलाच तिच्या आठवनींचा त्रास होईल ...
निघून जाईल ती दुसर्याबरोबर
मग नसताना ही असल्याचाच भास होईल ...

           ________ शैलेश



मला वेडू म्हणू नका
जरी तुम्हाला तसे वाटले ...
चित्त नाही थार्यावर
माझे मन कुणी तरी चोरले ...
काय बोलेन पुढल्या क्षणी
काही सांगता येत नाही
भास तिचे होताच
मी बरगळतो भलतेच काही ...
असूनही सभोवती सगळे
माझ्यातच एकाकी असतो ...
नसता कुणी सोबत
तिच्या आठवनीन बरोबर हसतो ...
रात्र आहे कि दिवस
काही ध्यान नाही ...
तहान भूक हरपली
कशाचीच स्मृती नाही ...
प्रेमवीरांना मी पहिला
म्हणायचो ठार वेडे ...
मलाच पडलेय आता
माझ्याच प्रेमाचे कोडे...........


________ शैलेश
 

शब्दांनी हि आज असं बरसावं
फ़क़्त तुझ्याच साठी तरसावं ....
११ ११ ११ क्षनांच्या सोनेरी साक्षीने
तुला आणि मला, चारोळीत बांधावं ....

             ________ शैलेश



खुदकन हसल्या तिच्या आठवणी
अन मनात शब्दांनी सूर छेडला ...
चारोळीच्या पाकळीत तिच्या आठवांचा
मकरंद मी वेचला ........

        ________ शैलेश



कधी बोलते तिचे हासणे
कधी खुणावती तिच्या नजरा ....
सहवासाचे गंध हि देती साद मुकी
झुलतो जेव्हा तिच्या केसातील गजरा ....

            ________ शैलेश



आठवनींचा नांगरच आता बोथट झालाय
खुपेल काळजात असा आता रुतत नाही .....
भावनांची मळीभ हि आता करपलीय अशी
होईल काव्याची बरसात असे काही सुचत नाही ....

                      ________ शैलेश

विसरू कसा तुला मी
हृदयातील प्रत्येक धडकेत
धडकातेस तू ...............

विसरू कसा तुला मी
माझ्या हृदयात
बनून श्वाश दरवळतेस तू .......

विसरू कसा तुला मी
रोम रोमात माझ्या
बनून रज वाहतेस तू ......

तुझ्याच प्रेमासाठी व्याकुळले हृदय माझे
भास तुझेच आहेत स्वाश माझे
थांबवून तरी त्यांना थांबवू कसा मी
विसरून तुला सांग जगू कसा मी ???


          ________ शैलेश

खरंच , प्रेम होतं का तिचं माझ्यावरती ???
प्रश्न पडतो कधी कधी , जीवघेणा मला ...
पिळवटत काळीज , अन विव्हळतं मन ...
निराश उत्तरतात जेव्हा , पापण्यांच्या कडा ...

             ________ शैलेश

मनात माझ्या ती अशी चिंब भिजली
नकळत माझ्या चारोळीत शिरली ....
वाचली जेव्हा तिने चारोळी माझी
काय सांगू कित्ती लाजली अन दिलबहार हसलि ......

             ________ शैलेश

प्रेमाच्या गप्पात ,
नेहमी मी रंग भरतो,
पण त्यात तिचे नाव आले की ,
का मी इतका गडबडतो ??? ...

        ________ शैलेश

माझ्या कवितेची ओळ पहिली
सुंदर अगदी हुबेहूब तिच्यासारखी ... : )

दुसरी ओळ मात्र काहीशी
माझ्या घाबरलेल्या मनासारखी ... : (

ओळ तिसरी थोडीशी तिच्या
साथ न देणार्या गूढ अबोल्यासारखी ... : (

अन शेवटची ओळ नेहमीच अपूर्ण ..................
वाट पाहत बसलेली , तिच्या माझ्या अधुऱ्या प्रेमासारखी .... : (

                     ________ शैलेश




मला तू पहावे , तुला मी पहावे
वेचन्यास क्षण आपुल्या भेटीचे
नभात तारकांनी क्षणभर थांबावे ....

पापणीचे तुझ्या खट्याळ इशारे
मी सहज ओळखावे ...
अन तुझ्या ओठ्न्च्या पाकळीवर
मन फुलपाखरू होवुनी बसावे ...

तुझ्या सहवासाच्या चांदण्यात
मी चिंब चिंब न्हावे ...
केसांतल्या तुझ्या सुगंधी मोगार्याने
माझे अंग अंग मोहरावे ....

रहावी थांबूनि रात चंचल
अशीच या मिलनाची ....
हातात हात गुंफून तुझ्या सवे
प्रीतीच्या धुंद मुलाखात .......बेधुंद होवुनी फिरावे ....!!!.......


                    ________ शैलेश



तन्हा तो अब भी हैं हम आज अपनों से दूर ;
बस सुकून इतना है की सबकी यादें साथ हैं......!!!........
हौसला ये है कि हम ढूंढ़ निकालेंगे उन्हें
और मालूम हमें नामो-निशां कुछ भी नहीं..............................
नभात तारकांचे
तेज ही मंद झाले ....
तुझ्या मुखचंद्रावर
जेव्हा स्मित न्हाले ....

________ शैलेश 




खर सांगू तुझा आता मला भलताच राग आलाय
मनातल्या मनात ओठ चावून , तुला मी शिव्यांच्या लाखोली दिल्याय ....
किती आणि का ग अशी ,झुरवतेस तू मला?
खरच का ग काहीच नाही वाटत , माझ्याबद्दल तुला ?
मनात तुझ्या नक्की आहे तरी काय?
गुदमरलोय ग फार , मनातलं काय ते आता तू सांगूनच टाक ...

बोलावसं वाटायचं खूप खूप तुझ्याशी
पण ओठांना नाही पेललं ....
ह्रुदयातलं प्रेमाचं फुलपाखरू
माझं कधीच नाही उडलं ....

         ________ शैलेश

बसून कल्पनेच्या शिखरावरती
सागराच्या उरात शोधलेलं ....
राहून लाखो मैल गावापासून दूर
घरच्या अंगणातलं वेधलेलं ...
लिहितो आम्ही असंच आपलं मनातलं ...!!!...
आठवणींच्या किनार्यावरती बसून
जिव्हाळ्याच्या लाटांनी भिजलेलं ...
आपुलकीच्या वाळूवरती
सुख दुखाचा गणित खोडलेलं ...
लिहितो आम्ही असंच आपलं मनातलं ...!!!...
कधी नव्या चाहुलीने हसलेलं
पहिल्या भेटीसाठी तरसलेलं ...
कधी शेवटच्या भेटीन व्याकुळ होवून
आठवणींत तिच्या, रात्री जागून रडलेलं ...
लिहितो आम्ही असंच आपलं मनातलं ...!!!...
आईच्या मायेतलं ,बापाच्या धाकातलं
बहिणीच्या राखीतलं थोडसं उशिरानच उमगलेलं
लिहितो आम्ही असंच आपलं मनातलं ...!!!...
कधी बस कधी लोकल मधल्या गर्दीच्या
डोळ्यांत लपलेलं .......
कधी तुझ्या कधी माझ्या कधी तू तर कधी मी
मनातलं जाणलेलं ....आपसूक वाचलेलं...लिहितो आम्ही असंच आपलं मनातलं ...!!!...


                                         ________ शैलेश

दिसली फेसबुक वर अचानक ती आणि मला कळालं ,
आयुष्याचा आनंद घेण्यासाठी मानसान माणूस म्हणून कसं घडावं ...
काय सांगू तिच्याबद्दल आणि बोलू तरी किती
किती हुल्लड , किती अल्लड खट्याळ अवखळ ,तीतुकीच भारी ...
स्वतातच रमणारी कधी गोल गोल भिंगरी ,
कधी दाहीदिशा दरवळणारी , रानातली कस्तुरी सुगंधी ...
पाहिली नाही कधी तिला कुणी , हि बातमी जरी खरी
ठावूक तरीही सार्यांनाच , मनात तिच्या प्रेम जिव्हाळ्याच्या लाखो करोडो खाणी ...
मन तीच इतकं भावूक निर्मल , कि याचा अंदाज नाही कुणाला
कविता शायरी चारोळी बनवून , रिझवते सर्वांच्या मनाला ...
तिच्या कवितांतून ती कधी , आम्हाला अश्रूंनी भिजवते
तर कधी कवितां वाचताना हसून हसून , आमुची पुरे वाट लागते ...
करावी मैत्री म्हणून धीरानं , एके दिवशी धाडली फ्रेन्डशिप रीक्वेस्ट तिला
दोन दिवसांच्या वेटिंग नंतर , तिने फ्रेण्डलीस्ट मध्ये add केलं मला
दिसली नाही ओंलैन कधी तरी , अपडेट तिचे दर सेकंदाला
ओंलैन आली कधी आणि Hi केले मी , कि चटदिसी गुडूप करी स्वताला ...
तरीही मला चांगला फ्रेंड मानायची , याची मला जाणीव असायची
माझ्या अपडेट्स नां लाईक करत , ती सर्वांच्याच अवती भोवतीच फिरायची ...
दिवसान मागून दिवस ढळले , आमचे धागे मैत्रीचे अजूनच घट्ट विणले
मन तिचे इतुके हासरे कि , पाहून तिजला चेहर्यावर आनंद उसळे ...
प्रश्न हि पडे मला कधी कधी , काय बरे इतुके कारण असेल
कि दुक्खाचा लवलेश हि तिला , कसला कधी ठावूक नसेल ...
लावणासाठी छडा याचा , मी खूप प्रयत्न केला
काही करून तिच्या आनंदाच्या झरा शोधायचा , चंगच मी छेडला ...
पाहिला जेव्हा मी तिच्या हासर्या चेहर्यामागचा खरा चेहरा
हादरून गेलो असा काही , अन सगळा आनंदच माझा विरला ...
कल्पना हि नव्हती मला कधी , असे असेल तिच्या गाठीला
देवाचच देन तिला जन्मजात मिळावं..... एक छिद्र तिच्या छातीला
कशी घडली कशी हसते , याची काहीच लिंक नाही लागत
कसं हसावं दुखःला गिळून , याच कोडंच नाही मला सुटत ...
पाहिल्यावर तिचा डोंगर दुखाचा , धडकी भरते आता उरात
हसू लागली आता ती कि , पाणीच येत माझ्या डोळ्यांत ...
माणसाने कसं असाव ,कसं हसावं ,हे फ़क़्त तिच्याकडून शिकावं
डोंगर संकटांचे सर करताना , कस त्या डोंगरातून रुजावं ...
हजार काटे उरात घेवून , गुलाबान कस फुलाव , हे तिच्याकडून जानावं
अडचणींच्या कोळश्यात हीरयान कसं चमकावं , हे हि तीनच सांगाव ...
त्यादिवशी मला कळाल , सोन refine कस होतं
हजारो तापाला जेव्हा ते वितळत , तेव्हाच ते तसं घडत ,
राहिली माझी हजार स्वप्ने अधुरी , तरी फिकीर नाही या मना ...........
बदल्यात सर्व इच्छा होवूदेत पूर्ण तिच्या , मित्राणु एवढीच एक प्रे करा .


                                   ________ शैलेश

अजूनही मी अगदी तसाच आहे..
तुझी प्रत्येक हालचाल
हृदयात गुंफणारा
माझ्या हरएक श्वासावर
तुझंच नाव लिहिणारा
बावरलेल्या माझ्या मनाला
तुझ्यापासून लपवणारा
तुझ्या सहवासाच्या झुळूकीला
माझ्या कवितांत लिहिणारा
अजूनही मी अगदी तसाच आहे..
तुझ्या ओठांवरच्या शब्दांना
फुलांसारखं झेलणारा
त्या शब्दांत मला शोधत
देहभान विसरणारा
हरघडी प्रत्येक क्षणी
तुझेच भास अनुभवणारा
अजूनही मी अगदी तसाच आहे..
कदाचित इकडून कदाचित तिकडून येशील
म्हणून दाहि दिशा शोधणारा
अचानक पाहशील वळून
कधीतरी हळुवार साद देशील
परतून येशील त्या वळणावरून माझ्यासाठी
याच आशेवर डोळ्यात प्राण गोठवून
तुझीच वाट पाहत थांबलेला ...
आजही मी अगदी तसाच आहे.......
आजही मी अगदी तसाच आहे.......फ़क़्त तू तेवढी बदललीस ....


                  ________ शैलेश

माळलास केसांत जेव्हा
तू गजरा मोगर्याचा .....
चंद्र हि विसरला क्षणभर तेव्हा
सहवास चांदनिचा ....

        ________ शैलेश

तू हासलीस कि नभी चंद्रही
शहारून मोठा होतो ....
सर्व तारका येतात एकवटून
अन तुझ्यासाठीच त्यांन्चा सप्तर्षी गजरा होतो ...

                 ________ शैलेश

म्हणाल प्रतिभा असेल माझ्यात काही
मुळीच नाही ...
म्हणाल विद्वत्ता असेल माझ्यात काही
मुळीच नाही ...
म्हणाल असेल मनकवडा दुसर्याच मन ओळखणारा
मुळीच नाही ...
म्हणाल शब्द भांडारांचा खजिना माझ्याजवळ
मुळीच नाही ...
म्हणाल रक्त आटवून सजवलेला शब्द अलंकारांचा दागिना असावा
मुळीच नाही ...
म्हणाल एकलकोंडा , विराग्वृत्तीचा काहीसा निराळा विक्षिप्त
मुळीच नाही ...
पण मनासभोवती जेव्हा एखादी घटना घडते ...
मग हृदय कधी पिळवटून तर कधी हर्षाने शहारून निघतं ...
तर कधी मनातल्या आठवणींचच काहूर उठून भावना उसळून येतात ...
तेव्हा हृदयात साठलेला उमाळा शब्दात मांडल्यावर शिवाय राहवत नाही
आणि हृदयातील भावनांना झरा फुटतो ....
शब्द त्यातून सहज ओघळून जातात अन कागदावर काहीतरी
खरडत राहातो ....
विचारांचा पक्षी मनाच्या पिंजर्यातून स्वतंत्र केल्यासारखा वाटते तेव्हा ...
मनही मोकळ होतं आणि विचारांच वादळही क्षमत हृदयामधलं ....
कविता मणजे नक्की काय ???... हे अजूनही नाही कळाले मला ...
उमगले हि नाही .....पण
शब्द पंखांनी विचारांचं बळ घेवून आताच उडालेला तो मनाच्या पिंजर्यातला पक्षी ...
कधी कुणाच्या नजरेला आला तर 

त्याला कुणीतरी .......  'कविता' असं म्हणताना ऐकलय मी ....

                   ________ शैलेश

 
झाल्या घटनांवर पांघरून घालावं
तर घावांवर नेहमी तोकडच पडतं ...
आठवणींच्या उशीवर टेकल्यावर
पांघरूनाचंच मग मिठागर बनतं ...

                  ________ शैलेश

कितना हसीन वोह मंजर होगा , जब तू मेरे साथ होगी ....
क्या खूब वोह अपनी , पहली मुलाकात होगी ....

सच हो जायेंगे तब , सब ख्वाब मेरे
जब तुम मेरे उस वक़्त , आस पास होगी ....

जो थी कल तक सिर्फ सपनों और खयालोन मैन
हात उसका हातोन मैन , और ओठोन पे मुस्कुरात होगी ....

उल्झनो मैन उलझती वोह खंदे पर,  सर रखेगी अपना ...
मेरी अन्खोन से तब ख़ुशी कि बरसात होगी ....

झुकी नजरोन को जब उठयेगी वोह मेरी तरफ
खुदा कसम तब , मौत भी ख़ुशी से कम न होगी ....

खाली दुवा यही करणा दोस्तोन खुदा से तुम इतनी , रोक दे घडी का वोह आलम
जब उसकी धडकन से मेरी धडकन कि , पेहली मुलाकात होगी.....


                                       ________ शैलेश

 
विचारले तिने तू अबोल
एकाकी का रे राहतो ???
फ़क़्त त्या उत्तरांनाच ठावूक
मी मौन का पाळतो .....

         ________ शैलेश

मनांत येत कधी कधी
माउस चा कर्सर व्हावं ....
तुझ्या प्रोफाइल वर फिरता फिरता
हळूच तुला चिमटा काढून...... पळून जावं ....

             ________ शैलेश