Monday, 9 January 2012

पहिल्या भेटीत तिच्या माझ्या
तिचा हात हातात मी घेतला ___
भर थंडीत गारठून सुद्धा
अंगात अंगार होता चेतला ___
काय होती माझी अवस्था
पहाण्यास क्षण हि होता थांबला ___
लाजलीस तू तेव्हा मधाळ अशी
अन तो क्षण हि काहीसा लाजला ___
भर दवात त्या गुलाबी थंडीत
उरात भडका असा फाटला ___
जळून गेला अंधार भीतीचा
अन प्रीतीचा दिवा होता पेटला ___
वातावरण झालं रोमेंटिक इतक
एवढ्यात तू पाय काढता घेतला ___
चोरालस अंग इतक्या अदेने
अन स्वाश हृदयाने होता रोखला ___
निरोप घेताना डोळ्यांतून तुझ्या
प्रीतीचा पावूस असा बरसला ___
माझ्या मनातला प्रियकर
तुझ्या डोळ्यांत कायमचा
विरघळला ___

                        _________ शैलेश 


No comments:

Post a Comment