Monday 9 January 2012

कविता तू खूप छान लिहितोस रे ... बोलायची ती मला ...
शब्द तुझे सारे माझ्या हृदयाला भावतात.
सारख पुन्हा पुन्हा सांगायची मला ....
वेडीच होती जराशी ती ...वाटायचं तिला ,
मी कविता कुणा दुसर्यासाठीच करतोय ...
पण मलाच फक्त माहित असायचे ....मी फक्त तिच्या हृदयासाठीच तर लिहितोय ...

कळत नकळत ती वळवाच्या पावसासारखी....खूप बोलायची ....
भिजवून मनसोक्त हृदयात....तळ आठवणींच साठवून जायची ....
अन माहित नाही... कुठेशी अचानक.... गायबच असायची ...
दूरवर त्या क्षितिजा पर्यंत जरी जावून शोधलं तरी ....कुणालाच नाही दिसायची...
मग मी तिच्या आठवणी च्या तळ्यात मस्त डूम्बायचो ....तिच्याच आठवणींच्या धुंदीत गुंतून पडायचो ....
तेव्हा शब्द सारे तिचेच... मात्र ..... कागद पेन माझे असायचे ......
तरीही भेटली कि उलट मलाच विचारायची .....कस काय तूला इतक छान सुचत रे ????
 

..........हां....कविता तर .... ती हि लिहायची ....
कविता .माझ्या कश्या आहेत सांगणा? .....म्हणून नेहमी माझ्याशी भांडायची ....
मी तर तिच्या कवितेतून स्वताला जगून घ्यायचो ....तिच्या प्रत्येक शब्दांत स्वताला शोधत राहायचो ......
वेड लागायचे मला .... तिच्या एकेका शब्दाच ....
मग मलाच नाही उमगायचं कि..... कस समजावायच तिच्या त्या वेड्या मनाला ...
कि फार आवडतात ग तुझ्या कविता माझ्याही हृदयाला ......


...........मी आजही लिहितो फक्त तिच्यासाठी .........
अन तिच्याच त्या सागरासारख्या अथांग आठवणींवर ..........
पण .... ती आज खूप दूर निघून गेलीये....
कवितेचा हा संसार एकटा माझ्यापाशीच ....अर्धवट सोडून .......
..................तिच्या स्वतच्या , नवीन कवितांसाठी ..... कदाचित .....कायमचीच ....


                                                          ________ शैलेश



No comments:

Post a Comment