Monday 9 January 2012

दोन वेणी,गालार खळी नाजूक नाक नकटा ...
सगल्य्यांचा लाडक्या... तायडा आमका धाकटा ....
औशी बरोबर सतत चंदनासारख्या झीजनारा   ...
वटवृक्षासारख्या भावंडांवर सावली बनत पसारनारा  ...
बापाशीची दया आणि औशीची माय रुजवून मनात ...
हिमालयासारख्या घडत गेलेला असा माझा तायडा ...

बापशीन माझ्यार हात उगारताच स्वतः हुंदको देवन फुटनारा  ...
पाठीवर हात फिरवीत धीर देत समजावणारा ...
माफी मागुक लावन बापाशी चे च डोळे भरून आणून ...
कुटुंबातल्या संगल्यांतलो दुवो बनान जगणारा असा माझा तायडा ...

भांडनात झिंजो उपटल्या वर कोपर्यात बसान रडणारा
लबाड भोळा बनान मैत्रिणीच्या नावान औशिसमोर ब्लेक-मेल करणारा
त्याच मैत्रिणीसमोर माझी तारीफ करीत माझी सेटीन्ग करून
कधीच न उकलू शकलेला प्रेमाचा गोंडस कोडा मणजे माझा तायडा ...

परीक्षेच्या रीझलट नंतर माझ्या प्रगतीपुस्तक लपवणारा
पुढच्या वर्षीची खोटे आशा बापाशीक दाखवीत
माझ्या लाल रेशेंच्या खाली तेंची सही मिळवणारा
अभ्यास कर असो दम देवन आत्मविस्वास जागवणारा असा माझा तायडा ...

वर्ष अखेराक माझ्या फाटक्या पुस्तकांका मायेन सावरणारा
चोकलेटी कवरानि सजवून आपणासाठी जपान ठेवणारा
शालेचो मिया नवीन ड्रेस घेतल्यावर बापाशीच्या रिकामी खिश्याकडे बघित
"माझो ड्रेस नवीनच हा " हसत
हसत बोलान , लापान ड्रेसचा ठीगाळ शिवणारा माझा तायडा ...

कालेजात सुट्टी म्हणन मिया गाढ झोपेत असताना
सावायीप्रामान नकळत सकाळी ५ क उठान डबो बनवणारा
मोगर्या सद्फुली जाई जुईची बाग अनगणात फुलवून
फुलांबरोबर हसत हसत एकटाच बोलत बसणारा माझा तायडा ...

राखी बंधन आणि भावूबिजेक सारखो भोवती पिंगो घालणारा
भावूबिजेचे पैसे परत करून अबुलीचो गजारो भावूबीज घेणारा
शाळेतली स्कॉलरशिप मिळवून वडिलांच्या हातात ठेवणारा
बाबांच्या घामाललेल्या पैसंचो चीज करीत सगळ्यांचो अभिमान बनलेला असा माझा तायडा ...

आता घरापासून मिया लय दूर रवतय...
माझ्याकडे इकडे सगळा आसा
पण तुझ्या सावली शिवाय तायडे
जग खूप वेगळा आणि भकास आसा ....




                _________ शैलेश

No comments:

Post a Comment