Monday, 9 January 2012

काहीतरी हरवल्यासारख वाटतंय ....
पावूससरी भिजल्यात मुसळधार ,
तरीही मन अगदी कोरडच वाहतंय  ....
नभात पुनवेचा प्रकाश निळसर ,
तरीही चांदण अंधराल्यासारख भासतंय ....
काहीतरी हरवल्यासारख वाटतंय ....

कवितेचा मोगरीसुगंध वेडावणारा
तरीही तो उदासवाणा गन्धालतोय
कवितांच्या गारा बरसती अंगांवर
तरीही त्या थंडाव्याला विझल्यासारख
भासतंय ...
काहीतरी हरवल्यासारख वाटतंय ....


कवितांचा गराडा सदाच अवती भोवती
तरी तिचा वाः ह मिळवण्यासाठी कुणीतरी थांबलय
सगळ असून सुद्धा अवतीभोवती
काहीतरी नसल्यासारख वाटतंय
काहीतरी हरवल्या हरवल्या सारखं वाटतंय ....काहीतरी हरवल्या सारखं वाटतंय ..



                                             ________ शैलेश






 

No comments:

Post a Comment