Monday, 9 January 2012

ति धुंद होवून भिजताना
पावूस-तुषार केसांवरून वाहायचे ....
होवून मोती त्या थेंबांचे
ते हि समाधानी हसायचे ....

ओले तिचे लांब केस
पावसाला देखील मोहरावायचे ....
सौदर्य पाहून तिचे , मन मात्र
तिच्या जवळ जायला भ्यायचे ....

पाहून तिला भिजताना
विजेनेही थोडे जळफळायचे ....
तिचे बावरलेले घाबरे रूप पाहून
आगीनेही पावसात आपोआप सुल
गायचे ....

दुरूनच पाहून तिचे ते रुपडे असे
मन तिच्यासाठी सारखे झुरायचे ....
तिच्या केसां
गुंतून बापडे
तिच्याच भाव-विश्वात रमायचे ....


             _________ शैलेश

No comments:

Post a Comment