Monday, 9 January 2012

एका सुंदर बनात
एक फुलपाखरू बागडायच
फुलांना कस मनापासून
अगदी ताज करून हसवायचं ....
फुलांना देखील त्याच्याशिवाय
थोड सुद्धा करमेना
त्या फुल्पखाराला पहिल्या शिवाय
बागेतली एक कळी देखील उमलेना .......
फारच अगदी ते भारी अवखळ
सारख कस भिरभिरणार
मधीच हसवून मधेच रडवून
सगळ्यांमध्ये मिसळून जगणार .....
बागेतल्या प्रत्येक फुल पाकळीवर
अगदी अव
डीन जावून बसायचं
थोडाच वेळ का असेना पण
सगळ्यांची खुशाली घेवून उडायचं ......
काय बोलाव तरी त्याच्या सौन्दर्याच
इतक्या भन्नाट चैतन्यान ते भरलेलं
इतक सुंदर हसायचं अन लाजायचं
आल जरी उशीरान , तरी इंद्रधनू बनून उधळायच
जणू फक्त त्या फुलपाखरासाठी
बागेतल फुलं न फुल
सुगंधी होवून दरवळायच
ते आपल्याच पाकळीवर येवून बसावं म्हणून
फुलहि अंग अंग मोहरून , सुंदर सुंदर रंगायचं ....
एक दिवस कशी नीयति अशी भोवली
कुणास ठावूक कशी पण
नजर कुणाची तरी लागली
फुलपाखरू ते अचानक
त्या बनात यायचच बंद झालं
अन बनच कस अगदी शांत शांत
अन प्रत्येक फुल कस स्तब्ध , अन उदास उदास झाल ......
कुणालाच काही कळेना
कुठून अन कस त्याला मनवाव
बागेत पुन्हा सुगंधी इंद्रधनू खेळवायला
काय सांगून बर त्याला बोलावाव .....
बागेतली आता कुठली कळी देखील
काही केल्या उमलेना
फुलल्या फुलांतून देखील
पहिल्यासारखा सुगंध हि दरवळेना
आजही बनताल्या प्रत्येक कळी फुलाला
त्या फुल्पखाराचीच फक्त ओढ आहे
पुन्हा परत ते येईल धावून
अन बनून लाट चेतान्याची
उसळेल ....याचीच आता प्रत्येकाला आस आहे

                                ________ शैलेश

No comments:

Post a Comment