Monday, 9 January 2012

नसतेस online जेव्हा
जीव तुटका तुटका होतो....
जी -टॉक चे विरती धागे
अन फेसबुक फाटका होतो ....

कमेंट्स तुझ्या नसता ,
कल्लोळ मनी असा उमडतो ...
ती पोस्टिंग दिशाहीन होते,
अन स्टेटस पोरका होतो .....नसतेस online जेव्हा ..


करुनी पुन्हा पुन्हा लॉगिन,
हिरमुसू
नि वाट तुझी मी बघतो ...
online चा हिरवा किनारा,
उसळल्यावाचून निपचित असतो ...नसतेस online जेव्हां ...


तुझ्या कामेंनट्स नि भरभरलेल्या,
पोस्टिंग्स पुन्हा पुन्हा मी स्मरतो ...
अन notifications विना प्रोफाईल असावे,
मी तसाच अगतिक होतो ....नसतेस online जेव्हां ...


                          _________ शैलेश


No comments:

Post a Comment