Tuesday 10 January 2012

दिसली फेसबुक वर अचानक ती आणि मला कळालं ,
आयुष्याचा आनंद घेण्यासाठी मानसान माणूस म्हणून कसं घडावं ...
काय सांगू तिच्याबद्दल आणि बोलू तरी किती
किती हुल्लड , किती अल्लड खट्याळ अवखळ ,तीतुकीच भारी ...
स्वतातच रमणारी कधी गोल गोल भिंगरी ,
कधी दाहीदिशा दरवळणारी , रानातली कस्तुरी सुगंधी ...
पाहिली नाही कधी तिला कुणी , हि बातमी जरी खरी
ठावूक तरीही सार्यांनाच , मनात तिच्या प्रेम जिव्हाळ्याच्या लाखो करोडो खाणी ...
मन तीच इतकं भावूक निर्मल , कि याचा अंदाज नाही कुणाला
कविता शायरी चारोळी बनवून , रिझवते सर्वांच्या मनाला ...
तिच्या कवितांतून ती कधी , आम्हाला अश्रूंनी भिजवते
तर कधी कवितां वाचताना हसून हसून , आमुची पुरे वाट लागते ...
करावी मैत्री म्हणून धीरानं , एके दिवशी धाडली फ्रेन्डशिप रीक्वेस्ट तिला
दोन दिवसांच्या वेटिंग नंतर , तिने फ्रेण्डलीस्ट मध्ये add केलं मला
दिसली नाही ओंलैन कधी तरी , अपडेट तिचे दर सेकंदाला
ओंलैन आली कधी आणि Hi केले मी , कि चटदिसी गुडूप करी स्वताला ...
तरीही मला चांगला फ्रेंड मानायची , याची मला जाणीव असायची
माझ्या अपडेट्स नां लाईक करत , ती सर्वांच्याच अवती भोवतीच फिरायची ...
दिवसान मागून दिवस ढळले , आमचे धागे मैत्रीचे अजूनच घट्ट विणले
मन तिचे इतुके हासरे कि , पाहून तिजला चेहर्यावर आनंद उसळे ...
प्रश्न हि पडे मला कधी कधी , काय बरे इतुके कारण असेल
कि दुक्खाचा लवलेश हि तिला , कसला कधी ठावूक नसेल ...
लावणासाठी छडा याचा , मी खूप प्रयत्न केला
काही करून तिच्या आनंदाच्या झरा शोधायचा , चंगच मी छेडला ...
पाहिला जेव्हा मी तिच्या हासर्या चेहर्यामागचा खरा चेहरा
हादरून गेलो असा काही , अन सगळा आनंदच माझा विरला ...
कल्पना हि नव्हती मला कधी , असे असेल तिच्या गाठीला
देवाचच देन तिला जन्मजात मिळावं..... एक छिद्र तिच्या छातीला
कशी घडली कशी हसते , याची काहीच लिंक नाही लागत
कसं हसावं दुखःला गिळून , याच कोडंच नाही मला सुटत ...
पाहिल्यावर तिचा डोंगर दुखाचा , धडकी भरते आता उरात
हसू लागली आता ती कि , पाणीच येत माझ्या डोळ्यांत ...
माणसाने कसं असाव ,कसं हसावं ,हे फ़क़्त तिच्याकडून शिकावं
डोंगर संकटांचे सर करताना , कस त्या डोंगरातून रुजावं ...
हजार काटे उरात घेवून , गुलाबान कस फुलाव , हे तिच्याकडून जानावं
अडचणींच्या कोळश्यात हीरयान कसं चमकावं , हे हि तीनच सांगाव ...
त्यादिवशी मला कळाल , सोन refine कस होतं
हजारो तापाला जेव्हा ते वितळत , तेव्हाच ते तसं घडत ,
राहिली माझी हजार स्वप्ने अधुरी , तरी फिकीर नाही या मना ...........
बदल्यात सर्व इच्छा होवूदेत पूर्ण तिच्या , मित्राणु एवढीच एक प्रे करा .


                                   ________ शैलेश

No comments:

Post a Comment