Monday, 9 January 2012

त्यादिवशी वर्गामधे लवकर येवून
बाकावर मी माझ हृदय कोरलं ....
खोचून बाण नाजूक तिरपा  ,
तुझ्या बाकाच्या दिशेला त्याच टोक ओढल ...
तुझ नाव लिहिताना तेव्हाहि कसा !!!....
आवंढा माझा सुकून गेलेला....
हृदयाचे छोटुले ठोकेहि जसे
वाट चुकून भरकटून गेलेले  .....
खळीमध्ये दडलेले गाल सुद्धा
कसे आंबट आंबट झालेले ...
अगदी सार तसंच घडल होत ...
जस तू सामोरी आल्यावर घडायच  ....
तसंच सार पुन्हा परत घडून
मन मात्र अगदी भारावून हरवलेलं !!!....

भारावलेला उठलो तसाच
थेट फळ्याजवळ आलो ...
गुलाबी रंगाच्या खडूने प्रेमान  ...
तुझं नाव फळ्यावर रेखाटल.....
ते पण अगदी माझ्या नावासमोर ...माझ्या नावा बरोबर .....
हासर लाजून तुझं नाव
बराच वेळ मी एकटक पाहिलं ...
डस्टर टेबलावर होता तरीदेखील
नाजूक हातानच ते अलगद पुसलं ...
अन स्वतःपुरत ग्लोरिफीकेशन केल  ...
खडूचे तुषार मिटवताना वाऱ्यावर बसून  ....
झुलत तरंगत चेहऱ्यावर,थिरकत आले ...
अन निरागस भाबड मन माझ
आनंदाने बेहोषीने वेडावून गेले ....

वर्ग सारा रीकामी अन शांत
बघत होता माझ्याकडे  ....
वर्गातल्या टेबल ,खुर्ची,बाकांना ...
गांधीजींच्या तसबिरीला , कच-याच्या डब्याला मात्र
हे सगळ प्रकरण ठाऊक झाले ....
बापुजी पण सुरुकुत्यान्मधून
हसल्यासारखे काहीसे भासू लागले ....
खुप आधार वाटला तेव्हा या सर्वांचा ...
वाटले.... आपण कोणासमोर तरी व्यक्त झालो ...

मोरपिसासारखा तरंगत होतो त्या दिवशी
घरी येऊन गाणी ऐकली इश्क मुहोब्बतची
किती उकळ्या फुटत होत्या म्हणून सांगू...?
वासरा सारखा हूंदडलो ,आईची सगळी कामे केली ..
शांत होऊन घरी संध्याकाळी , एक पत्र पण लिहिलं होत तुला एकांतात ....
त्या दिवशी झोपही आली नाही रात्री ...
तो दिवस आजही स्मरतो मला तसाच अगदी ....
आता बरीच वर्षे उलटून गेली ,
तू कुठे असशील ,कशी असशील
काहीच ठावूक नाही
आता  चेहराही काहीसा स्मृतुतुनी धुरकटलाय  ....
तरीदेखील आजही वहीतल्या पिंपळ पानासारख....
तुझं नाव पासवर्ड बनवून हृदयात ठेवलय ....
आजहि  पासवर्ड टाईप करताना ....
आवंढा सुकून जातो माझा ,हात काम्पावतो ,अन हृदयाच्या धडकांचे ठोके चुकू लागतात  ....
तुला मात्र यातले दुराव्याच्या भीतीने
कधीच नाही काही सांगितले  ......
अन फुलपाखरू तुझ्यावरच्या पहिल्या प्रेमाचे  ....
बाकावरच्या त्या हृदयातच अडकून कुढून कुढून मेले ....

............................................................शैलेश ......

No comments:

Post a Comment