परतून गेले कंठाजवळ ओलेशार हुंदके,
कोरड्या पापण्यांचे कडे पाणावलेले;
झिजल्या उंबरयावर पुन्हा अडखळले पाय,
अन सोडताना गाव ....काळजामधन फाटत गेलो पार ....
रांगत गुडघ्यांवर कितीदा ठेचाळलो,
धरून चार भिंतीना चालायला शिकलो;
कैक वर्षांच्या आठवणी या वाड्यान जपल्या,
अन सोडताना वाडा....चार भिंतीही थोड्या खचल्या ....
पारिजात, चाफा, अन फणस दारातला,
सळसळत जाग्यावरच निशब्द हळहळला;
जुन्या झाडांच्या उरी मायाच खास,
अन सोडताना बाग ....जाणती झाडेही थरारली आतून फार ....
हेलावून चालताना पानदितल्या पाचोळ्यावरून,
आवार सारा करकर करत तुटत होता ;
वाटा सार्या आवाटाच्या, सुन्न झाल्या दाही दिशा,
अन सोडताना वाटा ....माझ्यासावे त्याही जणू वेड्यापिश्या ....
_________ शैलेश

No comments:
Post a Comment