Monday, 9 January 2012

खरय ..मित्रा मी पण कविता करू लागलोय ....
भावाणाना शब्दांची फोडनि देवून
चवीनुसार यमक जुळवू लागलोय
मित्रा मी पण हल्ली कविता करू लागलोय ....

यमक आणि अर्थ यांचे मात्र
कधी पटायचेच नाही ...
पण हल्ली दोघांना मनवून
दोघांची समजूत घालायला लागलोय
खरय ..मित्रा मी पण कविता करू लागलोय


मैत्री प्रेम विरह ममता या भावनांना
शब्दालंकाराची साथ देवून
शब्द्श्रुंगार करू लागलोय
चार ओळीनच्या शेवटी यमक जूळवून
मित्रा मी पण कविता करू लागलोय ...


बसच्या लाईन मध्ये भुकेलो असताना
शब्दकोड्यांचा आस्वाद घेवू लागलोय
लोकलच्या उबगवाण्या गर्दीत चेन्गरताना
यमक खुलवून गालात हसू लागलोय
खरय...मित्रा मी पण हल्ली कविता करू लागलोय ....


कधी वेळी फक्त कविता वाचत होतो
संगीतामधूनि त्या अनुभवत होतो
आज काल भावनांना शब्दांत गुंफून
मनि आनंदून शहारु लागलोय
मित्रा मी पण कविता करून..... आता .... मित्रांना ती ऐकवू लागलोय ...


                _________ शैलेश

   

No comments:

Post a Comment