Tuesday, 10 January 2012

म्हणाल प्रतिभा असेल माझ्यात काही
मुळीच नाही ...
म्हणाल विद्वत्ता असेल माझ्यात काही
मुळीच नाही ...
म्हणाल असेल मनकवडा दुसर्याच मन ओळखणारा
मुळीच नाही ...
म्हणाल शब्द भांडारांचा खजिना माझ्याजवळ
मुळीच नाही ...
म्हणाल रक्त आटवून सजवलेला शब्द अलंकारांचा दागिना असावा
मुळीच नाही ...
म्हणाल एकलकोंडा , विराग्वृत्तीचा काहीसा निराळा विक्षिप्त
मुळीच नाही ...
पण मनासभोवती जेव्हा एखादी घटना घडते ...
मग हृदय कधी पिळवटून तर कधी हर्षाने शहारून निघतं ...
तर कधी मनातल्या आठवणींचच काहूर उठून भावना उसळून येतात ...
तेव्हा हृदयात साठलेला उमाळा शब्दात मांडल्यावर शिवाय राहवत नाही
आणि हृदयातील भावनांना झरा फुटतो ....
शब्द त्यातून सहज ओघळून जातात अन कागदावर काहीतरी
खरडत राहातो ....
विचारांचा पक्षी मनाच्या पिंजर्यातून स्वतंत्र केल्यासारखा वाटते तेव्हा ...
मनही मोकळ होतं आणि विचारांच वादळही क्षमत हृदयामधलं ....
कविता मणजे नक्की काय ???... हे अजूनही नाही कळाले मला ...
उमगले हि नाही .....पण
शब्द पंखांनी विचारांचं बळ घेवून आताच उडालेला तो मनाच्या पिंजर्यातला पक्षी ...
कधी कुणाच्या नजरेला आला तर 

त्याला कुणीतरी .......  'कविता' असं म्हणताना ऐकलय मी ....

                   ________ शैलेश

 

No comments:

Post a Comment